Header Ads

Breaking News
recent

रोहित शर्माने एंट्री करताच आयपीएलमध्ये रचला मोठा विक्रम, कोणता पाहा...

 

रोहित शर्माने एंट्री करताच आयपीएलमध्ये रचला मोठा विक्रम, कोणता पाहा...

रोहित शर्माने कोणात मोठा विक्रम रचला, पाहा...
रोहित चेन्नईविरुद्ध मैदानात उतरला नव्हता, पण आज केकेआरविरुद्धच्या सामन्यात मात्र रोहित खेळायला आला. युएईतील आजच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहितने या सामन्यात एका संघाविरुद्ध करताना हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये ही कामगिरी कोणात्याही फलंदाजाला करता आलेली नाही. रोहित हा अशी कामगिरी करणार आयपीएलमधील पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहितने आजच्या सामन्यात खेळताना संयतपणे सुरुवात केली. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र रोहितचे चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात फॉर्मात आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे रोहित आता ही आयपीएल गाजवणार, याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे या आयपीएलमध्ये रोहित कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

No comments:

Powered by Blogger.